तुळजापूरात पाणीटंचाई, दूषित पाणी व स्वच्छतेच्या प्रश्नावर उद्रेक; 20 मार्च रोजी नगरपरिषदेसमोर आंदोलनाची हाक

Spread the love

तुळजापूर :
तुळजापूर शहरातील विविध भागांमध्ये सध्या पाण्याची टंचाई जाणवत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील काही भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. तसेच स्वच्छतेच्या बाबतीतही अनेक ठिकाणी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.


यासंदर्भात तुळजापूर शहरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा सुरळीत करणे, स्वच्छता राखणे व दूषित पाण्याच्या समस्येवर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


या सर्व प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 20 मार्च 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता तुळजापूर नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात तुळजापूर नगर परिषदेचे विरोधी नगरसेवक तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते  तुळजापूर शहरातील सर्व नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
तसेच शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *