जिल्ह्यात पक्षबांधणीला नवी दिशा सात ठिकाणी नव्या नेतृत्वावर जबाबदारी, गावपातळीवर संघटन मजबूत करण्याचा निर्धार

Spread the love


धाराशिव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पक्षसंघटना अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यातील तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवून गावपातळीपर्यंत काँग्रेसची विचारधारा पोहोचविण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश निरीक्षकांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून केलेल्या शिफारशींच्या आधारे या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.


नियुक्त करण्यात आलेल्या अध्यक्षांमध्ये :
धाराशिव शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष – धनंजय रामभाऊ राऊत
धाराशिव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष – विनोद जीवनराव वीर
वाशी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष – अमर मुरलीधर तागडे
भूम तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष – ॲड. सिराज हुसेन मोगल
लोहारा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष – दयानंद सुग्रीव पाटील
तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष – ॲड. अरविंद बेडगे
लोहारा शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष – रौफ बागवान


या नियुक्त्यांमुळे धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला अधिक वेग मिळणार असून, नव्या कार्यकर्त्यांना पक्षात संधी उपलब्ध होईल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


नवनियुक्त अध्यक्षांसमोर गावागावात पक्षाची यंत्रणा मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे ही प्रमुख आव्हाने असणार आहेत.


दरम्यान, नवनियुक्त तालुका व शहर अध्यक्षांचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

आगामी काळात जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी हे नवीन नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *