तुळजापूर नगर परिषद समोर झळकले कचऱ्याचे बॅनर तुळजापूरमध्ये स्वच्छता व दूषित पाणीप्रश्नी लाक्षणिक उपोषण

Spread the love


धाराशिव: प्रतिनिधी प्रतीक वाघे


तुळजापूर (दि. २० मार्च २०२६) : शहरातील वाढत्या अस्वच्छतेच्या समस्या व दूषित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ आज तुळजापूरमध्ये सर्व विरोधी नगरसेवक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी एकत्र येत नगरपरिषद कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन केले.


या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी कचऱ्याचे प्रतीकात्मक बॅनर लावून तसेच दूषित पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या हातात घेऊन प्रशासनाचा निषेध नोंदवला. शहरातील विविध भागांत अस्वच्छतेचा वाढता स्तर, साचलेला कचरा आणि दुर्गंधीयुक्त, दूषित पाणीपुरवठा यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.


आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग होता. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. “नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.


प्रमुख मागण्या :
• स्वच्छता कामांची नियमित सुधारणा व सातत्यपूर्ण मॉनिटरिंग करणे
• दूषित पाणीपुरवठ्याची प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल जाहीर करणे
• निष्काळजी ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे
• नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करणे
• स्वच्छता संदर्भातील तक्रारींचे तत्काळ निराकरण करणे
या लाक्षणिक उपोषणामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, संबंधित विभागांकडून येत्या काळात कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *