मानवी हक्क अभियानाच्या धाराशिव जिल्हा कमिटीच्या बैठकीत उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यांच्या नियुक्त्या जाहीर जिल्हा संयोजकपदी आरीफ उस्मान शेख यांची निवड

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे

मानवी हक्क अभियानाच्या धाराशिव जिल्हा कमिटीच्या बैठकीत उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यांच्या नियुक्त्या जाहीर; जिल्हा संयोजकपदी आरीफ उस्मान शेख यांची निवड

येणेगर (दि. २ ऑगस्ट २०२६): मानवी हक्क अभियानाच्या धाराशिव जिल्हा कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज येणेगर येथे जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष खालिद पटेल, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत वाघे, शिवाजी कांबळे, उमरगा तालुका अध्यक्ष शिवकांत महादू गायकवाड, तुळजापूर तालुका अध्यक्ष तानाजी खांडेकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

संघटना अधिक सक्षम व तळागाळापर्यंत बळकट करण्याच्या उद्देशाने या बैठकीत उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यांच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. तसेच धाराशिव जिल्हा संयोजकपदी श्री. आरीफ उस्मान शेख यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ पवार यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

उमरगा तालुका कार्यकारिणी :

– तालुका अध्यक्ष – शिवकांत महादू गायकवाड
– तालुका उपाध्यक्ष – दिगंबर कुंडलिक सुरवसे
– तालुका सचिव – मौलाली नजीर साहेब
– तालुका कायदे सल्लागार – संदेश सुरवसे
– तालुका संघटक – संतकुमार अमृतराव नवले
– तालुका मुख्य सल्लागार – केरनाथ धोंडीबा गायकवाड
– उमरगा शहर अध्यक्ष – गोविंद गायकवाड
– तालुका युवा अध्यक्ष – रितेश शिवाजी कांबळे
– तालुका युवा उपाध्यक्ष – दीपक गायकवाड

लोहारा तालुका कार्यकारिणी :

– तालुका अध्यक्ष – चांदयाशा जिब्राहील खैराटे
– तालुका उपाध्यक्ष – असलम महेमूद पटेल
– तालुका उपाध्यक्ष – पांडुरंग ज्ञानदेव गोरे

तुळजापूर तालुका कार्यकारिणी :

तुळजापूर तालुका सचिव– दयानंद सोपानराव क्षीरसागर

यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ पवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संघटनेची विचारधारा गावागावात पोहोचविण्याचे तसेच सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

उपस्थित मान्यवरांनीही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

बैठकीचा समारोप संघटना विस्तार, आगामी उपक्रमांचे नियोजन आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावी लढा उभारण्याच्या निर्धाराने करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *