प्रतिनिधी : प्रतिक वाघे
धाराशिव : लोकशाहीर तथा साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष उमेश भैय्या राजे निंबाळकर यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याला विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी बोलताना निंबाळकर यांनी सांगितले की, डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला आवाज दिला. त्यांच्या लेखणीतून सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचला. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा जपून सामाजिक सलोखा आणि मानवतेची मूल्ये जोपासली पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असून, त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठी 24 तास सुपरफास्ट न्यूज तर्फे लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
