समता नागरी पतसंस्थेतर्फे रवींद्र इंगळे यांचा सत्कार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा विभाग प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल गौरव; संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Spread the love


प्रतिनिधी : प्रतीक वाघे


तुळजापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा विभाग प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल मा. श्री. रवींद्र इंगळे यांचा समता नागरी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेच्या संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील सामाजिक व शेतकरी चळवळीतील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रवींद्र इंगळे हे समता नागरी पतसंस्थेचे संचालक असून, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा विभाग प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने त्यांच्या कार्याचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.

यावेळी समता नागरी पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. प्रशांत रामचंद्र पेदे, व्हा. चेअरमन मा. श्री. अभिजित धनंजय कदम, संचालक मा. श्री. अविनाश बळीराम धट, मा. श्री. श्रीकांत उद्धवराव वाघे, मा. श्री. दीपक दत्तात्रय निकम, मा. श्री. आनंद नरसिंग कदम, मा. श्री. शिवलिंग सुभाष साबळे, मा. श्री. परमेश्वर फरीद जानराव, महिला संचालिका मा. सौ. सुकांता आगतराव काकडे, मा. सौ. वृषाली प्रतिक वाघे, तज्ञ संचालक श्री. कालिदास देविदास भोसले, व्यवस्थापक मा. श्री. नारायण देविदास शिंदे, तसेच पिग्मी एजंट मा. श्री. बब्रुवान विठ्ठल वीर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी रवींद्र इंगळे यांचा सत्कार करून त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

सत्कार सोहळ्यामुळे समता नागरी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. संस्थेचे व्यवस्थापक श्री. एन. डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *