प्रतिनिधी : प्रतीक वाघे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेनंतर जिल्हा काँग्रेस कमिटी, धाराशिवची नवीन कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीत विविध पदांवर अनुभवी तसेच सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
जिल्हा काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत दौलतराव नामदेवराव माने, विलास बाळासाहेब शाळू, नाना दादाराव भोसले, ॲड. सय्यद हुसेन फिरसाहेब इनामदार, आयुब खान अजीज खान पठाण, सयाजीराव विजयकुमार देशमुख, सरफराज हमीद काझी,
बाळासाहेब किसनराव गपाट, विजय महेंद्र वाघमारे, ॲड. जावेद रफिउद्दीन काझी, शामराव गणपत भोसले, राजेंद्र पांडुरंग शेंडगे आणि गौरीशंकर सिद्धप्पा मुळे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अशोक त्र्यंबकराव शेळके यांच्याकडे खजिनदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सरचिटणीसपदी नितीन शिवलिंग गाडवे, रमेशसिंह परदेसी (गोकुळसिंह), मधुकर पांडुरंग यादव, नादेर उल्ला कलीम उल्ला हुसेनी, बालाजी रूपचंद राठोड, रामचंद्र आलुरे आणि दिलीपराव भोकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिवपदी अशोक प्रभाकर भातलवांडे, अनंतराव साहेबराव घोगरे, श्रीकांत पुरुषोत्तम भालेराव, गजेंद्र हरिदास कदम, बालाजी गजेंद्र बंडगर आणि ॲड. दिलीप शंकरराव सागर यांना संधी देण्यात आली आहे.
याशिवाय धीरज अप्पासाहेब पाटील, विश्वास आप्पा शिंदे, नानासाहेब हरिश्चंद्र पाटील, डॉ. स्मिताताई शाहापूरकर, पांडुरंग तात्या कुंभार, मलंग शेख, राजाभाऊ शेरखाने, विजय मुद्दे, आप्पासाहेब पाटील, माधव अण्णा कुतवळ, रणजित दादा पाटील, दादासाहेब खरसडे, ॲड. गाजरे साहेब, उस्मान कुरेशी आणि सत्तार अहमद शेख यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे.
नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांवर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, गावागावांत काँग्रेसची धोरणे आणि विचार पोहोचविणे, तसेच शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्ष विस्ताराच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली ही कार्यकारिणी काँग्रेससाठी महत्त्वाची मानली जात आहे.
नव्या नियुक्त्यांमुळे पक्षाचे संघटनात्मक काम अधिक गतिमान होईल आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळेल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
