प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिवच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली असून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशानंतर लगेचच आमदार तानाजी सावंत यांनी त्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमुळे आगामी काळातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षप्रवेशानंतर झालेल्या या भेटीकडे केवळ औपचारिक भेट म्हणून न पाहता, आगामी राजकीय वाटचाल आणि संघटनात्मक रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.
या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली,
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणती रणनीती आखली जात आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये काय बदल होणार, याबाबत राजकीय निरीक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयानंतर समर्थक आणि विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच आमदार तानाजी सावंत यांची भेट ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, या भेटीमागील नेमका उद्देश आणि भविष्यातील राजकीय दिशा याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी धाराशिवच्या राजकारणात नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याची चर्चा रंगली आहे.
आगामी काही दिवसांत आणखी मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता; धाराशिवच्या राजकारणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष.
