प्रतिनिधी : प्रतिक वाघे
तुळजापूर : तुळजापूर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन सौ. अनिता श्रीकांत वाघे यांच्या वतीने पवित्र रामनवमीच्या निमित्ताने सर्व रामभक्तांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
रामनवमी हा भगवान श्रीरामांच्या जन्माचा पवित्र दिवस असून, हा सण श्रद्धा, भक्ती आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक मानला जातो. या शुभदिनी समाजात शांतता, एकता आणि सद्भावना नांदो, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
सौ. वाघे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, भगवान श्रीरामांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेऊन समाजातील प्रत्येकाने सत्य, कर्तव्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारावा. तसेच, सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, अशीही त्यांनी सदिच्छा व्यक्त केली.
