प्रतिनिधी : प्रतीक वाघे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NSUI) च्या धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुका व शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थी संघटना अधिक सक्षम करणे, महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर NSUIचा विस्तार करणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या नियुक्त्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) चे नियुक्त निरीक्षक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच NSUI जिल्हाध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड यांनी या नियुक्त्यांना मान्यता दिली आहे.
नवीन नियुक्त पदाधिकारी
भूम तालुका – अमृता भागवत शिंदे
वाशी तालुका – ओमकार उंदरे
धाराशिव शहर – मनसूर मकबूल सय्यद
उमरगा तालुका – योगेंद्र राजेंद्र माने
उमरगा शहर – गणेश अनिल सूर्यवंशी
लोहारा तालुका – अमित विरोधे
कळंब तालुका – ऋषिकेश टकले
परंडा तालुका – अजित अनिल जरांगे
परंडा शहर – सय्यद शादाब राहीद
नळदुर्ग शहर – रहमान शेख
नियुक्तीपत्रात नव्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करावे, NSUIची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करावी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारांचा विद्यार्थ्यांमध्ये व्यापक प्रसार करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी, NSUI कार्यकर्ते आणि समर्थकांकडून नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यात NSUIची संघटनात्मक ताकद वाढेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि काँग्रेसची विद्यार्थी संघटना अधिक सक्षम व प्रभावी बनेल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
