ढोकी पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; सराईत चोरट्याला बेड्या, चार गुन्ह्यांची उकल

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे


ढोकी (प्रतिनिधी) – ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडीच्या मालिकेतील एका सराईत आरोपीला अटक करत मोठी कारवाई केली आहे. आरोपीकडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, दोन आरोपी पोलिसांना पाहताच पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.


दिनांक 06 मे 2026 रोजी ढोकी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि विलास हजारे हे पोलीस ठाण्यात हजर असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे ढोकी गुन्हा रजिस्टर क्रमांक 143/2026 कलम 305 (A) बीएनएस मधील अज्ञात आरोपी हे 1) विकी सजगिरया शिंदे, 2) कृष्णा श्रावण शिंदे व 3) अजय श्रावण शिंदे असल्याची माहिती मिळाली. तसेच हे आरोपी कोंड व सुंभा परिसरात फिरत असल्याचे समजले.


या माहितीच्या आधारे सपोनि विलास हजारे, पोउपनि माळी, ग्रेड पोउपनि सातपुते, पोलीस हवालदार बागवान, मपोना रोकडे, पोलीस अंमलदार महेश शिंदे, नवनाथ खांडेकर व लक्ष्मण शिंदे यांच्या पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. शोधादरम्यान आरोपी विकी सजगिरया शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात आला. मात्र त्याच्यासोबत असलेले आरोपी कृष्णा शिंदे व अजय शिंदे हे पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून पसार झाले.


ताब्यात घेतलेल्या आरोपी विकी शिंदे याची झडती घेतली असता त्याच्याकडून 39 हजार रुपये रोख रक्कम तसेच अंदाजे 20 ग्रॅम वजनाचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. पुढील चौकशीत आरोपीने ढोकी पोलीस ठाणे हद्दीत चार ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.


या तपासात खालील चार गुन्ह्यांची उकल झाली आहे :
गु.र.नं. 46/2026 कलम 30 (A) बीएनएस
गु.र.नं. 55/2026 कलम 331(4), 305 (A) बीएनएस
गु.र.नं. 124/2026 कलम 305(8) बीएनएस
गु.र.नं. 143/2026 कलम 305 (A) बीएनएस
सदर प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास ढोकी पोलीस करीत आहेत.


ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विलास हजारे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *