प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव | प्रतिनिधी :
“आपला जीव – धाराशिव व्हिजन 2030” या संकल्पनेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी व्यापक जनसहभागाची हाक देण्यात आली आहे. सुरक्षित, समृद्ध आणि सक्षम धाराशिव घडविण्याच्या उद्देशाने नागरिक, प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, शेतकरी, उद्योजक, शिक्षक आणि युवा वर्ग यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज या अभियानातून अधोरेखित करण्यात आली आहे.
व्हिजन 2030 अंतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षण, सर्वांसाठी सुलभ आरोग्यसेवा, आधुनिक शेती, रोजगारनिर्मिती, उद्योगवाढ, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी कौशल्य विकास, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, स्वच्छता आणि डिजिटल प्रशासन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील विकासातील दरी कमी करून प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे ध्येयही या उपक्रमामागे आहे.
तसेच रस्ते, पाणीपुरवठा, वीज, सार्वजनिक वाहतूक, पर्यटन, धार्मिक स्थळांचा विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे आणि युवकांना आपल्या जिल्ह्यातच प्रगतीची संधी उपलब्ध करून देणे, हेही या व्हिजनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
“धाराशिवचा विकास हा केवळ शासनाचा नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचा संकल्प आहे. लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि विकासाभिमुख नियोजन यांच्या बळावर 2030 पर्यंत धाराशिवला महाराष्ट्रातील आदर्श जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.”
