परांडा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोमनाथ मच्छिंद्र मिश्कीन यांची नियुक्ती संघटना बळकट करण्याची जबाबदारी

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे

धाराशिव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेनुसार धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. उमेश राजे निंबाळकर यांनी परांडा तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री. सोमनाथ मच्छिंद्र मिश्कीन यांची नियुक्ती केली आहे.


या नियुक्तीमुळे परांडा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळणार असल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच विविध जनआंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटना अधिक मजबूत करणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी आता सोमनाथ मिश्कीन यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


नियुक्तीनंतर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री. सोमनाथ मिश्कीन यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरत परांडा तालुक्यात काँग्रेस पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याची भावना मिश्कीन यांनी व्यक्त केली.


या नियुक्तीमुळे परांडा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाच्या संघटन विस्ताराला नवी गती मिळेल, असा विश्वास जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *