धाराशिव : ऑनलाईन व्यवहार करताना झालेली चूकही मोठ्या फसवणुकीत बदलू शकते, याचा प्रत्यय किणी येथील एका महिलेच्या प्रकरणातून आला. मात्र सायबर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे तब्बल 1 लाख 54 हजार रुपयांची रक्कम परत मिळवण्यात यश आले आहे.
दि. 05 डिसेंबर 2025 रोजी पूनम दिपक दंडनाईक (रा. किणी, ता. जि. धाराशिव) यांनी धाराशिव येथील आडत बाजारात सोयाबीन विक्री केली होती. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाला पैसे पाठवताना त्यांनी चुकून चुकीच्या QR स्कॅनरवर 1,54,000 रुपये पाठवले. ही चूक लक्षात येताच त्यांनी संबंधित अज्ञात व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला; मात्र त्या व्यक्तीने पैसे परत देण्यास नकार दिला.
यानंतर तक्रारदार महिलेने तात्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल (NCCR) तसेच हेल्पलाईन क्रमांक 1930 वर तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त होताच सायबर पोलीस ठाणे धाराशिव यांनी त्वरित हालचाली करत संबंधित बँकेशी पत्रव्यवहार केला आणि संशयित खात्याची माहिती मागवली.
तक्रार वेळेत केल्यामुळे संबंधित खात्यातील रक्कम बँकेमार्फत ‘फ्रीज’ करण्यात आली होती. पुढे सायबर पोलिसांनी बँकेकडे रक्कम परत मिळवून देण्याबाबत पाठपुरावा केला. बँकेने न्यायालयाच्या आदेशाची मागणी केल्यानंतर आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अखेर दि. 17 मार्च 2026 रोजी तक्रारदार यांना संपूर्ण 1,54,000 रुपयांची रक्कम परत मिळाली.
रक्कम परत मिळाल्यानंतर पूनम दंडनाईक यांनी सायबर पोलीस ठाण्याचे आभार मानले. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख तसेच कर्मचारी गाडे व सूर्यवंशी यांनी केली.
दरम्यान, धाराशिव पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी. कोणतीही ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग किंवा आर्थिक गैरव्यवहार झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवावी. तसेच जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधल्यास तात्काळ मदत मिळू शकते.