नळदुर्गमध्ये घरात घुसून 21 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, गुन्हा दाखल

Spread the love


प्रतिनिधी : प्रतिक वाघे


नळदुर्ग (ता. तुळजापूर) : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 21 वर्षीय महिलेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून संबंधित तरुणाविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 31 मार्च 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजण्याच्या सुमारास आरोपीने पीडित महिलेच्या घरात प्रवेश करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच, हा प्रकार कोणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला दडपण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


घटनेनंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत दि. 01 एप्रिल 2026 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम 64, 115(2), 351(2)(4), 352 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कलम 3(1)(डब्ल्यू)(i)(ii), 3(2)(व्हि) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *