प्रतिनिधी : प्रतिक वाघे
मुंबई : भारतीय संगीतसृष्टीतील अजरामर आवाज आणि बहुआयामी गायकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी (१२ एप्रिल २०२६) मुंबई येथे वयाच्या ९२व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्या प्रकृती अस्वस्थतेमुळे उपचार घेत होत्या. छातीचा संसर्ग आणि वाढते अशक्तपण यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
आशा भोसले यांनी आपल्या तब्बल सात दशकांच्या कारकिर्दीत हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली. रोमँटिक, गझल, कॅबरे, लोकसंगीत ते भक्तिगीते अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची जादू निर्माण केली.
त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यांसारखे सर्वोच्च सन्मान मिळाले होते. त्यांच्या गायकीने अनेक पिढ्यांना भुरळ घातली असून, त्यांचा आवाज सदैव रसिकांच्या हृदयात जिवंत राहणार आहे.
त्यांच्या निधनानंतर पंतप्रधानांसह अनेक नामवंत कलाकार, राजकीय नेते व चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. “संगीत क्षेत्रातील एक युग संपले,” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून,
चाहत्यांसाठी अंतिम दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
