धाराशिव जिल्ह्यात पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा 15 मार्च रोजी

Spread the love


धाराशिव : धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन 2024–25 मध्ये रिक्त असलेल्या 123 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, मैदानी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आता पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
मैदानी चाचणीतून पात्र ठरलेल्या एकूण 1194 उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार, दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथे होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली आहे.
परीक्षेसाठी उमेदवारांनी सकाळी 07.00 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
उमेदवारांनी परीक्षेला येताना खालील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे –
महाआयटीकडून देण्यात आलेले मैदानी चाचणी व लेखी परीक्षेचे हॉलतिकीट
२ पासपोर्ट साईज फोटो
मैदानी चाचणीच्या वेळी पोलीस कार्यालयाकडून देण्यात आलेले ओळखपत्र
ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड / वाहन परवाना / मतदान ओळखपत्र यापैकी कोणताही एक वैध दस्तऐवज
जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्व उमेदवारांना वेळेत उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह परीक्षेला हजर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच परीक्षा प्रक्रियेदरम्यान शिस्त व नियमांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *