काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्कातून नागरिकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या नगरसेविका सौ. प्रगती किरण कदम चिवचिवे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

Spread the love

प्रतिनिधी प्रतीक वाघे


तुळजापूर शहरातील काँग्रेस पक्षाच्या सक्रिय व जनसंपर्कातून नागरिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या नगरसेविका सौ. प्रगती किरण कदम चिवचिवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, युवक मंडळी तसेच नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.


सौ. प्रगती कदम चिवचिवे या गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असून परिसरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास, महिला सक्षमीकरण तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांशी कायम संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले आहे.


वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण, वृक्षारोपण तसेच आरोग्य तपासणी शिबिर घेऊन वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.


यावेळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सौ. प्रगती किरण कदम चिवचिवे यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या जनसंपर्क व विकासकामांचे कौतुक केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *