प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव, दि. ६ : वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे एका युवकावर टोळक्याने जीवघेणा हल्ला करून त्याच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात तब्बल २० जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम बलभीम खामकर (वय २८, रा. तेरखेडा, ता. वाशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा येथील एनएच-५२ रोड तसेच खामकर कॉम्प्लेक्स परिसरात आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्यावर हल्ला केला.
फिर्यादीनुसार, आरोपींनी वाहनावर दगडफेक करून सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच दगड, काठ्या आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे
या प्रकरणी प्रशांत शिंदे (रा. साकत, ता. परंडा), अक्षय सोमनाथ चव्हाण, कृष्णा सतीश कदम, अनिकेत पांडुरंग उकरंडे, स्वप्निल बालाजी पौळ, राहुल उर्फ बालाजी दिलीप हालकरे, अच्युत रामेश्वर शिंदे, शुभम अच्युत शिंदे, कृष्णा नंदकुमार कचरे, सुमित अच्युत शिंदे, किशोर कचरू धावारे, सुरज अवधू, प्रतीक लोकरे, निखिल काळे (रा. तेरखेडा), चेतन येलकर, अभिजीत सुरवसे (रा. कडकनाथवाडी), शिवाजी जाधवर (रा. रत्नापूर), तुषार शिवाजी वाघमारे (रा. बाभळगाव), रणजित पोपट लुगडे (रा. खामकरवाडी) आणि स्वप्निल कोकाटे (रा. रई, ता. वाशी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून येरमाळा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 324(5), 125(बी), 189(2) व 191(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.
