प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर, दि. ७ : तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे माजी विद्यार्थी महेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. या सामाजिक उपक्रमात मराठी 24 तास सुपरफास्ट न्यूजचे मुख्य संपादक प्रतीक श्रीकांत वाघे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
आजच्या धकाधकीच्या जीवनात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाची गरज अधिक महत्त्वाची बनली आहे. याच भावनेतून वाढदिवसाचा आनंद पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करत महेश पवार यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. उपस्थितांनीही वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमास तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य घोडके सर, कदम सर, सावंत सर, सलगर सर, नागेश कुलकर्णी, बालाजी हंगरगेकर तसेच किरण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी महेश पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अशा विधायक उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी प्रत्येकाने आपल्या वाढदिवसासह इतर आनंदाच्या प्रसंगी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून भावी पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्याची जबाबदारी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त करत महेश पवार यांना निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
