धाराशिवमध्ये बालविवाहातून लैंगिक अत्याचाराचा गंभीर गुन्हा; वैद्यकीय जबाबानंतर गुन्हा दाखल

Spread the love

प्रतिनिधी : प्रतिक वाघे

धाराशिव, दि. ६ : धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 16 वर्षीय तरुणीच्या (नाव व गाव गोपनीय) वैद्यकीय जबाबावरून बालविवाह करून लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित मुलगी अल्पवयीन असताना दि. ९ जुलै २०२५ रोजी दुपारी सुमारे १२ वाजल्यापासून पुढे काही व्यक्तींनी संगनमत करून तिचा एका तरुणाशी बालविवाह लावून दिला. त्यानंतर संबंधित तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिली असून तिने एका मुलीला जन्म दिला आहे.

या प्रकरणी पीडितेने दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबाच्या आधारे धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(एच), ६४(२)(आय), ६४(२)(एम) तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ मधील कलम ९, १० व ११ आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ मधील कलम ४, ६ व १७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करीत असून, गुन्ह्यातील संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *