श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Spread the love



प्रतिनिधी : प्रतीक वाघे


अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार आणि धाराशिव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली “रघुपती राघव राजाराम” सत्याग्रह आंदोलन लोकशाही मार्गाने करण्यात आले.


आंदोलनाची सुरुवात श्रीराम मंदिरात “रघुपती राघव राजाराम” या भजनाच्या सामूहिक गायनाने करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित कथित गैरव्यवहाराची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.


यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांनी सांगितले की, धार्मिक स्थळांवरील भाविकांच्या श्रद्धा आणि विश्वासाशी कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही. श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्षाचा लढा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.


या आंदोलनात राजेंद्र शेरखाने, खलील सर, प्रशांत पाटील, धनंजय राऊत, अझर पठाण, अग्निवेश शिंदे, शिला उंबरे, मेहबूब पटेल, शिवाजी गायकवाड, वसंत मडके, जावेद काझी, दयानंद पाटील, अशोक बनसोडे, प्रभाकर लोंढे, जयसिंग पवार, अभिमान पेठे, अभिषेक बागल, सरफराज काझी, संतोष घोरपडे, पोपट शिंदे, मन्सूर शेख, महावीर चव्हाण, संकेत पडवळ, विजय मुद्दे, हरिदास शिंदे, गोरोबा झेंडे, भारतराव काटे, ॲड. अरविंद बेडगे, कल्याणकर करपे, नानाराव भोसले, बाबा मोमीन यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.


काँग्रेसच्या या आंदोलनामुळे श्रीराम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *