ॲट्रॉसिटीची धमकी देत पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप; उसात जनावरे चारण्यास विरोध करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याची तक्रार, काक्रंबा येथील दोघांवर गुन्हा

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे


तुळजापूर : उसाच्या शेतात जनावरे चारण्यास विरोध केल्याच्या कारणावरून वृद्ध शेतकऱ्याला धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी काक्रंबा येथील दोघांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश मस्के व सुरेश मस्के (दोघे रा. काक्रंबा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी

दि. ८ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास काक्रंबा शिवारातील शेत गट क्रमांक ७८५ मधील उसाच्या शेतात जनावरे चारत असल्याचे फिर्यादी मनोहर दासराव काळे (वय ७५ वर्षे, रा. वासुदेव गल्ली, भवानी रोड, तुळजापूर) यांच्या निदर्शनास आले.


फिर्यादी काळे यांनी उसात जनावरे चारू नका, असे सांगितल्यानंतर आरोपींनी त्यांना धमकावत दोन दिवसांत पाच लाख रुपये दे, अन्यथा जमीन आमच्या नावावर करून दे, अशी मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच पैसे किंवा जमीन न दिल्यास फिर्यादी व त्यांच्या मुलाविरुद्ध अॅट्रॉसिटी तसेच छेडछाडीची केस दाखल करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी मनोहर काळे यांनी दि. ११ जून २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आकाश मस्के व सुरेश मस्के यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *