धाराशिव ग्रामीण हद्दीत गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक उघड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Spread the love



प्रतिनिधी : प्रतीक वाघे


धाराशिव : गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवने धडक कारवाई करत सहा गोवंशीय जनावरे व पिकअप वाहन असा एकूण ११ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दिनांक २५ मे २०२६ रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार हे आपल्या पथकासह येरमाळा ते धाराशिव मार्गावर पेट्रोलिंग करत असताना गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित पिकअप वाहनाला थांबविण्याचा इशारा केला. चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केले.


वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये अत्यंत दाटीवाटीने गोवंशीय जनावरे भरलेली आढळून आली. जनावरे कुठून आणली व कोणत्या कारणासाठी वाहतूक केली जात आहे, याबाबत चालकाकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर संबंधित वाहन धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले.


पोलीस ठाण्यात दोन पंचांच्या उपस्थितीत वाहनाची तपासणी केली असता वाहनात सहा गोवंशीय जनावरे आढळून आली. तसेच पिकअप वाहनासह एकूण ११ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जनावरांना वाहनामध्ये हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा नसून अत्यंत त्रासदायक पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.


याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १२३/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (क), (घ), (ड) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भांगे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, पोलीस हवालदार दत्तात्रय राठोड, समाधान वाघमारे, दयानंद गादेकर, पोलीस नाईक अशोक ढगारे तसेच पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली.
फोटो क्रिएट करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *