तिळगुळ देण्याच्या बहाण्याने 17 वर्षीय तरुणीवर अत्याचार; जीवे मारण्याची व फोटो व्हायरलची धमकी, वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

प्रतिनिधी : प्रतिक वाघे
वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका गावातील 17 वर्षीय तरुणीवर तिळगुळ देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 15 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास पीडिता तिच्या शेतात काम करत असताना, त्याच गावातील एका तरुणाने तिला तिळगुळ देण्याचा बहाणा केला. तिने तिळगुळ घेतल्यानंतर तिला चक्कर आल्यासारखे वाटू लागले. याच अवस्थेचा फायदा घेत आरोपीने तिला जबरदस्तीने आडबाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप फिर्यादीत नमूद आहे.
घटनेनंतर आरोपीने पीडितेला धमकावत, “ही बाब कोणाला सांगितल्यास तुला जिवंत सोडणार नाही, तसेच तुझे छायाचित्र व्हायरल करीन,” अशी धमकी दिली. भीतीमुळे पीडिता काही काळ गप्प राहिली. अखेर धैर्य एकवटत तिने दि. 29 एप्रिल 2026 रोजी वाशी पोलीस ठाण्यात प्रथम खबर (FIR) नोंदवली.
या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 64(1), 64(2)(एम), 137(2), 127(3), 78, 115, 351(2) तसेच पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *