आफुच्या झाडाची लागवड करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
वाशी पोलीस ठाणे :दि.27.02.2026 रोजी पोलीस निरीक्षक- श्री. शिंदे पोलीस ठाणे वाशी यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पकरुड शिवारातील शेतात मध्ये इसम नामे- अशोक नरहरी चव्हाण, वय 60 वर्षे, राजेंद्र आत्माराम चव्हाण, वय 60 वर्षे, धोंडीराम कोडींबा चव्हाण, वय 50 वर्षे, तिघे रा. पकरुड ता.भुम जि. धाराशिव यानी त्यांचे शेतात आफुच्या झाडाची लागवड केलेली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन बातमीच्या ठिकाणी हजर रहा असे सांगीतले वरुन स्टाफ सह सदर ठिकाणी जाउन नमूद इसमास अफुच्या झाडाची लागवडी बाबत चौकशी केली असता त्यांनी सदर शेतात आफुच्या झाडाची लागवड केल्याचे सागिंतले असता सदर शेतातील 58 किलो 745 ग्रॅम वजनाचा अफु एकुण 8,81,175₹ किंमतीचा माल मिळून आल्याने सदर माल त्याचा सविस्तर पंचनामा करुन जप्त करुन ताब्यात घेउन आफुची लागवड करणारे अशोक नरहरी चव्हाण, वय 60 वर्षे, राजेंद्र आत्माराम चव्हाण, वय 60 वर्षे, धोंडीराम कोडींबा चव्हाण यांचेविरुध्द एन. डी. पी. एस कायदा 8(ब),18 अन्वये गुरंन 72/2026 असा गुन्हा वाशी पो.ठा. येथे 28.02.2026 रोजी नोंदवला आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, घोडके, पोउपनि भाळे, पोलीस हावलदार बोरकर, लाटे, चौघुले, पोलीस अमंलदार मंलगनेर,मिसाळ, खैरे, कोरदे, यांचे पथकाने केली आहे.
