साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे राज्य पुरस्काराने मानवी हक्क अभियानाच्या अध्यक्षांचा गौरव; संविधानाची प्रत देऊन सन्मान

Spread the love


प्रतिनिधी : प्रतीक वाघे
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मानवी हक्क अभियानाच्या अध्यक्षांना यंदाचा साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे राज्य पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

या सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारासोबत संविधानाची प्रत देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
समाजातील वंचित, पीडित व दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत जनजागृती करणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अध्यक्षांच्या कार्याचे कौतुक करत, त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांना न्याय मिळाल्याचे नमूद केले. संविधानाच्या मूल्यांचा प्रसार आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.


पुरस्कार स्विकारताना अध्यक्षांनी हा सन्मान सर्व कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगत, पुढील काळातही समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *