जिल्ह्यात चर्चेत असलेल्या खून प्रकरणात मोठी प्रगती; मुख्य आरोपी दीपक गरड अटकेत

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे



दि.10/06/2026 रोजी पोलीस ठाणे आंबी गुरण ९३/२६ कलम 103 (1), 3 (5) BNS प्रमाणे चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खुनाचे प्रकरणातील मुख्य आरोपी हा फरार असून नमूद फरार आरोपी नामे दीपक विक्रम गरड रा. चिंचपूर खुर्द ता. परंडा जि. धाराशिव हा बसवकल्याण, राज्य कर्नाटक येथे आहे

अशी गोपनीय माहिती मिळाल्याने मा. पोलीस अधीक्षक श्रीमती. रितू खोखर मॅडम व अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार, स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बसवकल्याण राज्य कर्नाटक येथे माहिती मिळालेल्या

ठिकाणी जाऊन नमूद आरोपीचा शोध घेत असताना नमूद आरोपी हा पोलिसांना पाहून पळून जात असताना पथकाने अतिशय शीताफिने त्याचा पाठलाग करून त्यास पकडून ताब्यात घेऊन त्याला पुढील कायदेशीर कार्यवाही कामी पोलीस ठाणे आंबी येथे हजर केले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार गुन्हे शाखा धाराशिव सपोनि श्री. सचिन खटके, पोलीस हवालदार/ विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चापोअ/रोहित दंडनाईक यांचे पथकाने केली आहे.सविस्तर हेडलाईन व बातमी तयार करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *