प्रतिनिधी : प्रतीक वाघे
दि.03/04/26 रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार साहेब स्थागुशा धाराशिव यांच्या आदेशान्वये येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेमध्ये गर्दीचे ठिकाणी मालाविषयी गुन्हे घडणार नाहीत याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गर्दीचे ठिकाणी पायी पेट्रोलिंग करीत असताना
गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आमराई परीसरातील मंदीराचे जवळ गर्दीमध्ये दोन महिला व एक इसम हे गदर्दीमध्ये चोरी करण्याचे इरादयाने संशयीतरित्या फिरत आहेत त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माहिती मिळालेल्या ठिकाणी पायी चालत जावुन नमुद महिला व पुरूष यांचेवर पाळत ठेवुन थांबले असता ते गदर्दीमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव बाबत विचारले असता
ते समाधानकारक उत्तरे देत नसल्याने व त्यांचेवर संशय आल्याने त्यांना पोलीस ठाणे येरमाळा येथे आणून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव
।) अनिल शेषेराव शिंदे वय 34 वर्ष 2) सुनिता अनिल शिंदे वय 29 वर्षे 3) हिराबाई रमेश शिंदे वय 40 वर्षे सर्व रा. इंदीरानगर पाथरी ता. पाथरी जि. परभणी असे सांगीतले त्यांचा संशय आल्याने पंचाना बोलावून पंचासमक्ष नमुद इसमांची अंगझडती घेतली असता अनिल शिंदे याचे पैटचे खिशात 04 वेगवेगळे सोन्याचे मनी मंगळसुत्र मिळाले त्याबाबत त्याचेकडे नमुद मिळालेले सोन्याचे दागीन्या बाबत विचारले असता त्याने सांगीतले की, सकाळी 07.00 ते 09.00 चे दरम्यान येरमाळा बीड हायवेवर ब्रीज संपल्यावर उजव्या बाजुला रोडलगत यात्रेतील भाविकांना अंघोळीची व्यवस्था केली होती.
माझ्यासोबतच्या या दोन महिलांनी तेथे गर्दीमध्ये महिला अंघोळ करत असताना त्यांचे गळयातील सोन्याचे दागीने चोरी करायचे व माझ्याकडे आणुन दयायचे असे सांगीतले. नमुद आरोपीचे अंगझडतीमध्ये एकुण 04 वेगवेगळे मनी मंगळसुत्र एकुण 1,31,000 रूचे सोन्यचे दागीने मिळुन आल्याने ते गुन्हयात जप्त केले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती. रितु खोखर व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, पोलीस हवालदार/विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोह/शोभा बांगर, चापोह/महेबुब अरब, रोहीत दंडनाईक यांचे पथकाने केली आहे.
