सौ. अनिता श्रीकांत वाघे यांची चेअरमनपदी निवड; तुळजापूर काँग्रेसतर्फे सत्कार

Spread the love

तुळजापूर : तुळजापूर येथील खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी सौ. अनिता श्रीकांत वाघे यांची निवड झाल्याबद्दल तुळजापूर शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.


या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या हस्ते सौ. अनिता वाघे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी चांगले काम करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.


या कार्यक्रमाला नगरसेवक अमोल कुतवळ, रणजीत इंगळे, आनंद जगताप, नरेश काका पेंदे, बाळासाहेब कदम, युसुफ मामा शेख, श्रीकांत रसाळ, सुदर्शन वाघमारे, किरण यादव, टिनू कदम, गोपाळजी सुरवसे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सौ. अनिता श्रीकांत वाघे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *