बालविवाह लावून तरुणीवर लैंगिक अत्याचार; मुरुम पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

Spread the love

प्रतिनिधी प्रतिक वाघे


धाराशिव जिल्ह्यातील : मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. एका गावातील 17 वर्षे 8 महिने वयाच्या तरुणीचा संगनमताने बालविवाह लावून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार,

दि. 07 मार्च 2025 ते दि. 27 एप्रिल 2026 या कालावधीत आरोपी क्रमांक 1 ते 6 यांनी एकत्र येऊन एका तरुणासोबत तिचा विवाह लावून दिला. त्यानंतर संबंधित तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी पीडितेने दि. 29 एप्रिल 2026 रोजी मुरुम पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिल्यानंतर पोलिसांनी भा. न्या. सं. कलम 64(1), 64(2)(एम), 137(2), 127(3), 78, 115, 351(2) तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यान्वये कलम 4, 6, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. दोषींवर कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *