तुळजापूरमध्ये दहशत दुकानदाराकडे १० हजारांची खंडणी मागितली नकार देताच मारहाण करून ७,५०० रुपये लुटले

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे


तुळजापूर : तुळजापूर शहरातील बागवान शॉपिंग सेंटरमध्ये कपडे शिवण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीकडे १० हजार रुपयांची मागणी करून, पैसे देण्यास नकार दिल्याने शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण करत खिशातील ७ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.

या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार लक्ष्मीकांत भिसे आणि करण संतोष परदेशी, दोघेही रा. तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव, हे ११ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास बागवान शॉपिंग सेंटर येथे गेले. यावेळी ते फिर्यादी संतोष विनायक जाधव (वय ४५, रा. ताकविकी, ता. जि. धाराशिव) यांच्या कपडे शिवण्याच्या दुकानात आले.


आरोपींनी जाधव यांच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली. यावेळी जाधव यांनी, “तुम्हाला कशाचे आणि का पैसे देऊ?” अशी विचारणा केली. त्यावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.


यानंतर आरोपींनी जाधव यांच्या खिशातील ७ हजार ५०० रुपये बळजबरीने काढून घेतले, अशी तक्रार तुळजापूर पोलिसांत दाखल करण्यात आली.


या प्रकरणी संतोष जाधव यांनी ११ सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 308(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *