(प्रतिनिधी) : प्रतीक वाघे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी सहकुटुंब तुळजापूर येथील श्री आई तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी सुखी-समृद्ध राहावेत, शेतीला भरभराट लाभावी आणि “शेतकरी राजा सुखी राहू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे” असे साकडे आई तुळजाभवानीच्या चरणी घातले.
दर्शनानंतर नाना पटोले यांनी मंदिर परिसरात उपस्थित भाविकांशी संवाद साधत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होऊन त्यांना न्याय मिळावा, अशी प्रार्थना केल्याचे सांगितले.
यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील, तुळजापूर नगर परिषद गटनेते अमोल कुतवळ, नगरसेवक रणजित इंगळे, आनंद जगताप, तालुकाध्यक्ष अरविंद बेडगे, हरीश चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नाना पटोले यांच्या तुळजाभवानी दर्शनामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करत राज्यातील जनतेच्या हितासाठी त्यांच्या प्रार्थनेला देवीचे आशीर्वाद लाभावेत, अशी भावना व्यक्त केली.
