बेंबळी परिसरात जंगलात तरुणीवर अत्याचार; उशिरा गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू

Spread the love

प्रतिनिधी : प्रतिक वाघे

बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दि. 6 एप्रिल 2026 रोजी एका गावातील तरुणाने जंगल परिसरात एका मुलगी/महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली.


या प्रकरणी पीडित महिलेने (नाव व गाव गोपनीय) दिलेल्या प्रथम खबरेनुसार दि. 14 एप्रिल 2026 रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर काही दिवसांनी तक्रार दाखल झाल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे.


पोलीसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 64(1) व 79 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. तसेच पीडितेला आवश्यक वैद्यकीय व कायदेशीर मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *