तुळजापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने ६८वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा १८ ते २२ मार्च रोजी वाघोली पुणे येथे संपन्न होत आहे.त्या स्पर्धेतील विजेत्या मल्लास देण्यात येणार्या मानाच्या गदे चे दि.११मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत तुळजाभवानी चरणी विधीवत पुजन करण्यात आले .
कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी महाराष्ट्र केसरी मानाची गदा केद्रीय नागरी उड्डाण मंत्री मा.पै.मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या वतीने देण्यात येणार आहे ही गदा दि.११ मार्च रोजी सकाळी १०.३०वाजता तुळजापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखवल होताच फटाक्याची भव्य अतिषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिरा पर्यत ढोल ताशाच्या गजरात गदेची भव्य मिरवनुक काढण्यात आली होती.
यानंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आईतुळजा भवानीच्या चरणी विधीव पुजन करण्यासाठी तुळजाभवानी मंदिरात दाखल करण्यात आली.यावेळी आई तुळजा भवानीच्या चरणी मान्यवरांच्या उपस्थीत गदे चे विधीवत पुजन करण्यात आले. महाराष्ट्र केसरीची गदा तुळजा भवानीच्या पावन भूमीत पूजनाचे यावर्षीचे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण आण्णा सातव पाटील व ग्रामस्थ वाघोली पुणे यांच्या टीमने केले होत.
तुळजाभवानी चरणी मानाची गदा पुजनासाठी रामकृष्ण आण्णा सातव पाटील व वाघोली ग्रामस्थ,धाराशिव जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष पै.विशाल नाना देवकर,उपनगराध्यक्ष आबा रोचकरी, विशाल रोचकरी,आनंद रोचकरी,बबलू धनके श्रीराम गोडगे,भारत डाकवाले, अभिराम पाटील,माऊली गोडगे,बालाजी मिस्कीन,आप्पा कारंडे,रामेश्वर कारले,तात्या बहीर,मामु जमादार,सुंदर जवळगे यांच्यासह धाराशिव जिल्हा कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी,पैलवान मोठ्या संख्याने उपस्थित होते.
