प्रतिनिधी प्रतिक वाघे
तुळजापूर : तुळजापूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संघाच्या चेअरमन सौ. अनिता श्रीकांत वाघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संघाचे माजी चेअरमन सुनील जाधव, सचिन सुधीर कदम, श्रीकांत वाघे, दयानंद क्षीरसागर यांच्यासह संघाचे पदाधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर उपस्थित सर्व शेतकरी, पदाधिकारी, कर्मचारी व पत्रकारांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी चेअरमन सौ. अनिता श्रीकांत वाघे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि त्यांच्या न्याय्य हक्कांवर ठाम भूमिका व्यक्त केली.
“शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी यापुढेही कायम लढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार,” असा निर्धार सौ. अनिता श्रीकांत वाघे यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत तुळजापूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच शेतकरी हिताच्या उपक्रमांना चालना देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
देशाच्या स्वातंत्र्याचा गौरवपूर्ण इतिहास स्मरणात ठेवत शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी एकजुटीने काम करण्याचा संदेश या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातून देण्यात आला.
तुळजापूर तालुका खरेदी-विक्री संघात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायम लढण्याचा चेअरमन सौ. अनिता श्रीकांत वाघे यांचा निर्धार
