कोल्हेगावात दुहेरी मृत्यूची धक्कादायक घटना; कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा दाबून खून, पतीची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे


धाराशिव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कोल्हेगाव येथे कौटुंबिक वादातून अत्यंत धक्कादायक दुहेरी मृत्यूची घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतः शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.


ढोकी पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, आरोपी श्रीकृष्ण तुकाराम टेकाळे (वय 27, रा. कोल्हेगाव ता. जि. धाराशिव) याने दि. 09 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 04.45 ते सकाळी 07.00 वाजण्याच्या दरम्यान कौटुंबिक वादाच्या कारणावरून पत्नी साक्षी श्रीकृष्ण टेकाळे (वय 22) हिचा गळा दाबून खून केला.


घटना घडल्यानंतर आरोपीने स्वतःच्या शेतातील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुहेरी मृत्यूमुळे गावात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.


याप्रकरणी फिर्यादी सतीश शंकर शिंदे (वय 38, रा. वाखरवाडी ता. जि. धाराशिव) यांनी दि. 04 मे 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 103(1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


पोलीस पुढील तपास करत असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *