प्रतिनिधी : प्रतिक वाघे
तुळजापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर शहरात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक तसेच तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन यांच्या उपस्थितीत आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करत अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे नगरसेवक अमोल कुतवळ, अमर मगर, ऋषिकेश मगर, आनंद जगताप, रणजीत इंगळे, प्रगती लोंढे, रवींद्र इंगळे, बालाजी तट, अफसर शेख, राहुल खपले, उत्तम अमृतराव यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
तसेच तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन सौ. अनिता श्रीकांत वाघे, माजी चेअरमन सुधीर कदम यांच्यासह इतर मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा जागर ठेवण्याचा आणि सामाजिक समतेसाठी कार्य करण्याचा संकल्प केला.
या अभिवादन कार्यक्रमामुळे तुळजापूरमध्ये आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि एकात्मतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
