कळंब तालुक्यातील डिकसळ येथून 17 वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांची शोधमोहीम वेगात

Spread the love

कळंब : तालुक्यातील डिकसळ परिसरातून अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमजत जाफर पठाण (वय 43, रा. फरीदनगर, तांदुळवाडी रोड, डिकसळ, ता. कळंब, जि. धाराशिव) यांचा मुलगा आयान अमजत पठाण (वय 17 वर्षे) याला दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरातून पळवून नेल्याची घटना घडली.
घटनेनंतर मुलगा बेपत्ता असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र मुलाचा काहीच मागोवा न लागल्याने अखेर दि. 16 मार्च 2026 रोजी अमजत पठाण यांनी कळंब पोलीस ठाण्यात धाव घेत प्रथम खबर दिली.
या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भा. न्या. सं.) कलम 137 (2) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, संशयितांची चौकशी तसेच विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित मुलाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ कळंब पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *