प्रतिनिधी : प्रतीक वाघे
कळंब : कळंब तालुक्यातील एका गावात एका तरुणीवर कथित लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(1), 351(2) तसेच पोक्सो कायद्यातील कलम 4, 6, 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून उपलब्ध माहितीनुसार, 29 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास आरोपी हा घराच्या मागील बाजूने घरात येऊन पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच, “ही घटना कोणाला सांगितली तर जिवे ठार मारीन,” अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पीडितेच्या आईने 1 जुलै 2026 रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
