लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी, आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

प्रतिनिधी : प्रतिक वाघे


आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीत 29 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी (नाव गावगोपनीय) हिला गावातील एका तरुणाने लग्नाचे आश्वासन देत वेळोवेळी लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार दि. 14 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दि. 16 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


या कालावधीत आरोपीने पीडितेस शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच, पुन्हा लग्नाचा विषय काढल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या सर्व प्रकारामुळे पीडित तरुणी मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती.
अखेर धैर्य एकवटत पीडितेने दि. 21 एप्रिल 2026 रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 115 (2), 351 (2), 352 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *