आदिवासी पारधी समाजातील गरजूंना शासकीय योजनांचा लाभ, धाराशिव येथील विठ्ठल पवार यांना न्या. शैलेश ब्रम्हे यांच्या हस्ते इ-रिक्षाची चावी

Spread the love

आदिवासी पारधी समाजातील गरजूंना शासकीय योजनांचा लाभ, धाराशिव येथील विठ्ठल पवार यांना न्या. शैलेश ब्रम्हे यांच्या हस्ते इ-रिक्षाची चावी

धाराशिव –
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने 1 मार्च रोजी धाराशिव येथील लेडीज क्लब येथे आयोजित विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यात न्या. शैलेश ब्रम्हे यांच्या हस्ते आदिवासी पारधी समाजातील विठ्ठला भारत पवार यांना इ- रिक्षा देण्यास आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा न्या.श्रीमती अभिश्री देव, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलिस अधीक्षक श्रीमती.रितू खोखर,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या.श्रीमती भाग्यश्री पाटील व जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.अमोल वरुडकर, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांची उपस्थिती होती. महामेळाव्यात आदिवासी घटकातील गरजू लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *