प्रतिनिधी : प्रतिक वाघे
धाराशिव जिल्ह्यातील भुम शहरात गोलाई चौक, भिमनगर परिसरात मोठा तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली असून पोलिसांवर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भुम पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नामनिर्देशित ६० हून अधिक आरोपींसह सुमारे १५० अनोळखी इसमांविरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ मे २०२६ रोजी रात्री ११.०० वाजेपासून ते १६ मे रोजी पहाटे १२.३० वाजेच्या सुमारास गोलाई चौक, भिमनगर, भुम येथे मोठा जमाव एकत्र जमला होता. या वेळी जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर जमाव जमल्याची माहिती मिळाल्यानंतर भुम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद कारभारी करोदे हे आपल्या स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले होते.
पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावातील काही जणांनी पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करत अचानक दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद करोदे हे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच जमावाने परिसरातील काही चारचाकी वाहनांची तोडफोड करून गाड्या पलटी करत मोठे नुकसान केल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे.
या प्रकरणी आरोपी म्हणून अक्की उर्फ अक्षय गायकवाड, संदीप सरवदे, रत्नदिप सरवदे, सचिन अशोक शिंदे, शाक्या शिंदे, मुकुंद लगाडे, अनिकेत थोरात, अक्षय युवराज गायकवाड, विकी उर्फ फक्कड गौतम जावळे, साजन शिंदे, रितेश गायकवाड, अनिकेत शिंदे, विठ्ठल अण्णा बाराते, दत्ता गाढवे, अवधुत गाढवे, अनिकेत महाडिक, रोहित टिपे, अनिकेत टिपे, अमित मस्कर, पिन्नु मस्कर, किरण रेवडकर, मनोज आकरे, निखिल काळे, अर्जुन जाधव, ज्ञानेश्वर आकरे, गणेश लोंढे, प्रभाकर शेंडगे, सचिन मस्कर, सचिन बनसोडे, दिपक हुरकुडे, दत्ता जाधव, आबासाहेब मस्कर, प्रभाकर गोंगाणे, आकाश शेंडगे, सुयोग पठाण, गणेश शेंडगे, लखन बाबर, श्रीकांत गायकवाड, बापू मस्कर, दिपक नाईकवाडी, यश वाघवकर, दिनेश मस्कर, सुशांत निकम, सुमित भोळे, शंतणु भोळे, कृष्णा नाईकवाडी, रुशी साबळे, सुरज भोसले, लक्ष्मण यादव, कृष्णा जगदाळे, सुजित जिक्रे, राहुल रिटे, रोहन भोसले, आदेश लिंबकर, प्रथमेश सुपेकर, विजय जिक्रे, आनंद गुरव, अनिकेत गिलबिले, सिद्धु धन सरवदे यांच्यासह अन्य १५० अनोळखी इसमांचा समावेश आहे.
फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद करोदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून भुम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १०९, ११८(२), १३२, १२१(१), १८९, १९१(१), १९१(२), १९०, १९२, १९५, १९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर भुम शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून पुढील तपास भुम पोलीस करत आहेत.
